मित्रहो, आज एक बातमी वाचण्यात आली की, formal sector मधील कर्मचाऱ्यासाठीआनंदाची बातमी आहे। सेवानिवृत्ती परतावा रुपी मिळणाऱ्या रकमेवर म्हणजे २० लाखावरील रकमेवर उत्पन्न करावंर सूट दिलीगेली आहे। म्हणून मी आज आपणांस आपल्या सेवानिवृत्ती परतावा (Retirement Gratuity) वर थोडी माहितीसांगत आहे। आज आपण जुनी पेन्शन साठी वेगवेगळ्या पातळीवर लढत आहोत, पूर्वीची पेन्शन चालूझाल्यास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी असेल अशी आशा करूयात।
सेवानिवृत्ती परतावा। (Retirement Gratuity)
सेवानिवृत्ती परतावा म्हणजे आपण जेंव्हा आपल्या सेवेचे ६० वर्ष पूर्ण होतात किंवा अनिवार्यसेवानिवृत्ती घेतो तेंव्हा मिळणारे मानधन म्हणजे सेवानिवृत्ती परतावा होय।

सेवानिवृत्ती परतावा कोनाकोणास मिळतो ।
हा परतावा सर्व कर्मचारी ज्यांची पात्रता सेवेची ५ वर्ष पूर्ण झाली असतील त्या सर्वाना हा परतावामिळतो। ------ आपल्या मानधनाच्या १/४ दराने प्रत्येकी ६ महिन्याचा काळ पात्रता सेवा पूर्णझाल्यावर।
------ हा परतावा जास्तीत जास्त मानधनाच्या १६ १/२ किंवा २० लाख मिळतील।
------- परतावा जेंव्हा आपली महागाई भत्ता ५०% होईल तेंव्हा २५% आपला परतावा वाढेल।

स्पष्टीकरणाकरिता उदाहरणे:
समजा, माझी नियुक्तीची तारीख २१/०३/२०११ असेल आणि मी दिनांक १६/०१/२०१८ रोजी अनिवार्यसेवानिवृत्ती घेण्याचे ठरविलें तर मला किती परतावा मिळेल?
मूळ पगार = ३१४०० , महागाई भत्ता= ५%
------ नियुक्तीची तारीख - २१/०३/२०११ अनिवार्य सेवानिवृत्तीची तारीख - १६/०१/१८
---------माझी सेवेची संपूर्ण ६ वर्ष ९ महिने होतात।
सूत्र: सेवानिवृत्ती परतावा= मूळ पगार + महागाई भत्ता × १/४ × सेवेची पूर्ण वर्ष ( ६ महिने पूर्ण म्हणजे १ ) 
३२९७० ( ३१४००+१५७०)×१/४ × १३
१०७१५२ /-- रुपये परतावा मिळेल।


दिलीप गौतम सरवदे
छटाई सहाय्यक, पणजी सॉर्टींग (72497789855)